ट्रस्टीज

दिवसेंदिवस श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांची संख्या वाढत आहे. श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विश्वस्त व्यवस्था तत्पर आहे.

सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव (ता. यावल जि. जळगांव महाराष्ट्र भारत ) (रजिं नं इ 554) ही संस्था 1991 मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थापक - अध्यक्ष कै. वसंत शंकर चौधरी व सोपान शंकर वाणी, जळगाव यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेने आतापर्यंत केलेली काही ठळक प्रकल्पे :

  • मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन ६६ X ४६ फूट असा भव्य 'सभामंडप' बांधला.
  • महाराष्ट्र शासनाच्या मदतीने मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता बांधून वाह्तूक व्यवसथा उपलब्ध केली.
  • भाविकांच्या सोयीसाठी दुमजली ८० X ४० फूट 'श्रीमनुदेवी भक्त निवास' बांधले.
  • भाविकांच्या सोयीसाठी ३२ X ३२ फूट 'अष्टकोनी यज्ञ मंडप' बांधला.
  • भाविकांच्या सोयीसाठी 'पूजा साहित्य भांडार' ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरु केले आहे.
  • शौचालय सेवा उपलब्ध केली.

भाविकांकडून या सर्व कार्यासाठी आर्थिक मदत होत आहे त्यासाठी भाविकांचे विश्वस्त मंडळ आभारी आहे.

संस्थेची पुढील उद्दीष्टे :

  • मंदिराचा ४० फूट उंचीचा कळस बांधणे.
  • मंदिरात विजेची व्यवसथा करणे.
  • आरोग्यसेवा उपलब्ध करणे.

श्रीमनुदेवी भक्तांना दर्शनास येणे सुलभ व्हावे, कोणत्याही भक्तांची गैरसोय होऊ नये, स्वत:च्या इछेप्रमाणे दैनदिंन पूजाविधीत सहभागी होता यावे यासाठी विश्वस्त व्यवस्था प्रयत्नशील आहे. काहीही माहिती पाहिजे असल्यास मंदिर परिसरात गणवेशधारी सेवक दिसतील त्यांना विचारता येते.

श्रीमनुदेवीचा प्रसार जगभर व्हावा व भक्तांना माहिती मिळावी या हेतूने व्यवस्थेने संकेतस्थळ ( वेबसाईट ) विकसीत केले असून या माध्यमातून श्रीमनुदेवीचे उस्तव, पूजाविधी, मंदिर परिसर इ. माहिती प्रसारीत करण्यात येते.